‘लोकपाल’ पुढील आठवड्यात संसदेत ?

May 15, 2012 1:16 PM0 commentsViews: 4

15 मे

बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित लोकपाल विधेयक पुढील आठवड्यात संसदेत सादर होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षांशी चर्चा करून सरकारने विधेयकात काही बदल केले आहेत. यामध्ये लोकपालाच्या प्रमुखाला फक्त खासदारच हटवू शकतील तसेच सरकारी अनुदान घेणार्‍या संस्थाच फक्त लोकपालाच्या कक्षेत असतील त्याचबरोबर सीबीआयला लोकपालाच्या कक्षात घेण्यासंदर्भात अजून स्पष्टता नसल्याचं सुत्राकडून कळत आहे. लोकपाल विधेयकावर लवकरच विरोधी पक्षांच्या नेत्यासोबत आणखी काही बैठका होणार आहेत.

close