मान्सून 7 जूनला राज्यामध्ये धडकण्याची शक्यता

May 15, 2012 4:05 PM0 commentsViews: 114

15 मे

राज्यात दुष्काळ परिस्थितीशी सामना करणार्‍या तमाम दुष्काळग्रस्तांना थंडावा देणारी बातमी म्हणजे यंदा मान्सून 1 जूनला केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात 7 ते 10 जूनपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रात दाखल होणार आहे. अशी माहिती पुणे वेध शाळेनं दिली.

यंदाच्या वर्षी भीषण पाणी टंचाईला राज्यातील जनतेला सामोरं जावं लागलं. हंडाभर पाण्यासाठी चार-चार किलोमिटर पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. दुष्काळाच्या मुद्यावर मे मध्यावर आल्यावर सुध्दा सरकार पातळीवरुन कोणतीच मदत पोहचू शकली नाही. आता पावसाळा जवळ आला आहे त्यामुळे सरकार काहीच करणार नाही अशी चर्चा सर्वसामान्यांमध्ये सुरु आहे. मान्सून जूनच्या दुसर्‍या आठवड्यात राज्यात दाखल होणार आहे. पण स्वत:चं सरकार काही करु शकले नाही पण आता वरुण राजेचं दुष्काळग्रस्तांच्या मदतीला धावून आले आहे.

close