रुपयाची घसरगुंडी

May 16, 2012 12:04 PM0 commentsViews: 7

16 मे

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण सुरुच आहे आणि त्याचा परिणाम आज शेअर मार्केटवरही जाणवला. रुपयाने आज नवा नीचांक गाठलेला आहे. एका डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत आहे 54.43 एवढी.. रिझर्व्ह बँकेचे प्रयत्न रुपयाची घसरण रोखू शकलेले नाहीत. आणि रुपया घसरल्यामुळे आता आयातीचा खर्चही वाढणार आहे. त्यामुळे त्याचा परिणाम महागाई वाढण्यावर होईल असं जाणकारांचं म्हणणं आहे.

रुपयाच्या या अवमूल्यनामुळे सेन्सेक्सही आज 300 अंकांनी कोसळला आणि आता हा निर्देशांक 16 हजार 30 वर स्थिरावला आहे. निफ्टीमध्येसुध्दा दोन टक्क्यांची घट झालेली आहे. सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात तेलाच्या दरात थोडी घट झाली असली तरी देशात सोन्याच्या दरांमध्ये पुन्हा वाढ अपेक्षित आहे. देशापुढे सध्या असलेल्या या आर्थिक संकटाबद्दल नियोजन आयोगाचे माजी सदस्य भालचंद्र मुणगेकर यांनी राज्यसभेत कालच चिंता व्यक्त केली होती. रुपयाची घसरण सुरुच (रु. विरुध्द डॉलर)

- जानेवारी 2012 : 53.30- 15 मे, 2012 : 53.97 – 16 मे, 2012 : 54.44

close