पुणे विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.वासुदेव गाडे

May 15, 2012 4:33 PM0 commentsViews: 9

15 मे

गेल्या आठ महिन्यांपासून रिक्त असलेल्या पुणे विद्यापीठाचं कुलगुरुपद अखेर भरण्यात आलं आहे. जेष्ठ शिक्षण तज्ञ डॉ. वासुदेव गाडे यांची कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल के. शंकर नारायण यांनी याबाबत आज मंगळवारी घोषणा केली. डॉ.गाडे हे महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठ विकास मंडळाचे संचालकपदी कार्यरत आहे. मागिल वर्षी 15 सप्टेंबरला डॉ. आर.के. शेवगावकर यांनी राजीनामा दिल्यानंतर पुणे विद्यापीठाचा कारभार प्रभारी कुलगुरुंच्या हाती होती. आता डॉ. गाडे यांच्या कुलगुरुपदासाठी पाच वर्षासाठीचा कार्यकाळ असणार आहे.गाडे यांनी जैवविज्ञान या विषयात एम.एस्सी, एम.फिल आणि पीएचडी मिळवली आहे. तसेच फ्रान्स आणि स्वीडनमध्ये दोन वर्ष पोस्ट डॉक्टरेल फेलो होते.

close