दुष्काळाग्रस्त महाराष्ट्रासाठी फक्त 700 कोटींची मदत

May 15, 2012 5:16 PM0 commentsViews: 71

15 मे

अखेर केद्र सरकारने दुष्काळाग्रस्त महाराष्ट्रासाठी फक्त 700 कोटी रुपयांची मदत मंजूर केली आहे. राज्य सरकारने केंद्राकडे 2200 कोटींची मागणी केली होती. पण केंद्राने मात्र फक्त सातशे कोटीच देऊ केले आहेत. ही मदत दुष्काळग्रस्त 15 जिल्ह्यातल्या 11 तालुक्यांसाठी तात्काळ देण्यात येणार आहे. या पैकी 580 कोटी रुपये हे कृषीसाठी, तर 74 कोटी रुपये हे बागायती शेतीसाठी दिलेत. टँकर आणि चार्‍यासाठीही निधीची तरतूद करण्यात आली ाहे. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची भेट घेऊन दुष्काळग्रस्त महाराष्ट्राला 2200 कोटी रुपयांची मदत देण्याची मागणी केली होती. राज्य सरकारने दुष्काळावर कायमची मात करण्यासाठी करण्यात येणार्‍या योजनांसाठी आणखी 700 कोटी रुपयांची मागणी केली होती यात राज्यातील रखडलेल्या सिंचनाच्या कामांसाठी हा निधी हवा असल्याचं राज्य सरकारनं सांगितल होतं.

close