आजारी पायलट्सच्या खोट्या सुट्‌ट्या !

May 15, 2012 5:55 PM0 commentsViews: 3

15 मे

एअर इंडियाचे पायलट्स आणि मॅनेजमेंट यांच्यातला वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. आजारपणाची सुट्टी टाकून कामावर न येणार्‍या पायलट्सच्या घरी आज डॉक्टरांनी भेट दिली. त्यावेळी 53 पैकी 48 पायलट्स घरीच नसल्याचं त्यांना आढळलं. तर एका पायलटने आपला खोटा पत्ता नोंदवल्याचंही उघड झालंय. यावर हवाई वाहतूक मंत्र्यांनी कठोर शब्दात टीका केली. संपाचा आज आठवा दिवस आहे. आज 28 उड्डाणं रद्द करण्यात आली. एअर इंडियाचं संपामुळे आतापर्यंत 100 कोटींचं नुकसान झालं आहे. दरम्यान, अधिवेशन सुरू असतानाही या मुद्द्यावर मीडियापुढे वारंवार वक्तव्य दिल्यामुळे हवाई वाहतूक मंत्री अजित सिंग यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.

close