सायमंड पुन्हा एकदा वादात

November 24, 2008 5:47 PM0 commentsViews: 10

24 नोव्हेंबर कॅप्टन रिकी पॉण्टिंगला दंड झाला. पण ऑस्ट्रेलियाचा आणखी एक खेळाडू अडचणीत सापडण्याची शक्यता आहे. तो खेळाडू म्हणजे अँड्र्यू सायमंड. तसं सायमंड आणि वाद यांचं जुनंच नातं आहे.शिस्तभंगाच्या कारवाईनंतर नुकतंच त्याने ऑस्ट्रेलियन क्रिकेट टीममध्ये कमबॅक केलं. पण कमबॅकच्या पहिल्याच टेस्टनंतर सायमंड पुन्हा एकदा वादात सापडला आह. ब्रिस्बेन इथं एका हॉटेलमध्ये एका क्रिकेट फॅन बरोबर सायमंड्सचं भांडण झालं. आणि प्रकरण हाणामारी पर्यंत गेलं. सिडने मॉर्निंग हेराल्ड या न्यूज पेपरने दिलेल्या बातमीनुसार न्यूझीलंड बरोबरची टेस्ट मॅच संपल्यावर हे प्रकरण घडलं.भांडणाला सुरुवात सायमंड्सने केली नाही हे आता त्याला सिद्ध करावं लागेल. नाहीतर सायमंड्सवर पुन्हा एकदा बंदी लादली जाऊ शकते.

close