मावळमध्ये दुसर्‍याच्या रिव्हॉल्वरने गोळीबार केला – संदीप कर्णिक

May 16, 2012 3:02 PM0 commentsViews: 7

16 मे

मावळ गोळीबार प्रकरणात झालेला गोळीबार हा इतर अधिकार्‍यांनी परिस्थितीनुसार केला असल्याचा बचावात्मक खुलासा तत्कालीन ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप कर्णिक यांनी आपल्या जबाबत केला आहे. तसेच मी सुध्दा परिस्थितीनुसारंच गोळीबार केला यावेळी माझी रिव्हॉल्वर माझ्याजवळ नसल्याने मी माझ्या बॉडीगार्डच्या रिव्हॉल्वरने हा गोळीबार केला असल्याचं कर्णिक यांनी आपल्या साक्षीत सांगितलं आहे. आज संदीप कर्णिक यांची निवृत्त न्यायाधिशांच्या चौकशी आयोगासमोर साक्ष नोंदविण्यात आली. या साक्षीत गोळीबार केल्याची कबुली कर्णिक यांनी दिली.

मागिल वर्षी नऊ ऑगस्टला मावळ येथे पवना धरणातून पिंपरी चिंचवडला बंदिस्त जलवाहिनीव्दारे पाणी नेण्याच्या योजनेला विरोध करण्यासाठी शेतकर्‍यांनी पुणे-मुंबई एक्स्प्रेस हायवेवर आंदोलन केले. आंदोलनला हिंसक वळण लागल्यामुळे पोलिसांनी आंदोलक शेतकर्‍यांवर गोळीबार केला. या गोळीबारात तिन शेतकर्‍यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी तिन निवृत्त न्यायाधीशांची चौकशी समिती स्थापन करण्यात आली. आज तत्कालीन ग्रामीण पोलीस अधिक्षक संदीप कर्णिक यांची साक्ष प्रतिज्ञापत्रातील 27 क्रमांकाच्या मुद्यात नोंदवण्यात आली. शेतकर्‍यांवर गोळीबार हा इतर अधिकार्‍यांनी परिस्थितीनुसार केला. यावेळी मी सुध्दा परिस्थितीनुसारंच गोळीबार केला यावेळी माझी रिव्हॉल्वर माझ्याजवळ नसल्याने मी माझ्या बॉडीगार्डच्या रिव्हॉल्वरने हा गोळीबार केला. मी स्वत: व माझ्या आदेशान्वये जो गॅस फायर,प्लास्टीक बुलेट फायर व पक्का गोळीबार केला आहे. घटना घडली ते ठिकाण हे सुमारे 1 किलोमिटर परीघात आहे. माझ्याशिवाय बंदोबस्तातील काही पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांनी देखील गॅस फायर, प्लॉस्टिक राऊंड फायर व पक्का गोळीबार केला असून तो त्यांनी परिस्थिती व आवश्यकतेनुसार आपले स्वत:चे आदेशान्वये वेगवेगळ्या ठिकाणी केला आहे अशी साक्ष कर्णिक यांची नोंदवण्यात आली.

close