सिंचनाचं ‘अर्थ’सत्य बाहेर येणार

May 16, 2012 9:41 AM0 commentsViews: 5

16 मे

अखेर सिंचनाबाबत श्वेतपत्रिका काढण्याची घोषणा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जलसंपदा खात्याच्या कारभारावर काँग्रेससह विरोधकांनी टीका केली होती. तसेच प्रसारमाध्यमांनीही हा विषय लावून धरल्यानंतर अखेर श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याचं समजतंय. गेल्या दहा वर्षात सिंचनावर 78 हजार कोटी रुपये खर्च होवूनही फक्त 0.1 टक्का सिंचनाची क्षमता राज्यात वाढली. त्यामुळे इतका खर्च झाल्यानंतरही सिंचनाची क्षमता इतकी कमी कशी वाढली या बाबतची वस्तुस्थिती समोर यावी यासाठी श्वेतपत्रिका काढण्यास काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सहमती दर्शवल्याचं कळतंय.

राज्यातल्या सर्व विभागांमध्ये अनेक सिंचन प्रकल्प रखडले आहेत.

प. महाराष्ट्र : 155 प्रकल्प अपूर्णमूळ किंमत : 4,195 कोटीआतापर्यंत खर्च : 9,980 कोटीनिधीची गरज : 8,064 कोटी

विदर्भ : 341 प्रकल्प अपूर्णमूळ किंमत : 10,614 कोटीआतापर्यंत खर्च : 15,157 कोटीअति. निधीची गरज : 33,051 कोटी

कोकण : 77 प्रकल्प अपूर्णमूळ किंमत : 957 कोटीआतापर्यंत खर्च : 4,209 कोटीअति. निधीची गरज : 6,012 कोटी

उ. महाराष्ट्र : 152 प्रकल्प अपूर्णमूळ किंमत : 5,794 कोटीआतापर्यंत खर्च : 3,526 कोटीअति. निधीची गरज : 9,116 कोटी

मराठवाडा : 345 प्रकल्प अपूर्णमूळ किंमत : 7,035 कोटीआतापर्यंत खर्च : 3,120 कोटीअति. निधीची गरज : 5,512 कोटी

close