जैतापूर प्रकल्पासाठी जनमत घ्यावं – गिते

May 16, 2012 5:12 PM0 commentsViews: 9

16 मे

शिवसेनेचे खासदार अनंत गीते यांनी आज लोकसभेत जैतापूर अणुऊर्जाप्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला. या प्रकल्पाला जनतेचा मोठ्या प्रमाणावर विरोध आहे. फुकुशिमाच्या घटनेनंतर, जपानच्या पंतप्रधानांनी जनतेच्या परवानगीशिवाय नवे अणुऊर्जा प्रकल्प सुरू करणार नाही असं जाहीर केलं होतं. त्यामुळे आता भारत सरकारने आपली भूमिका स्पष्ट करावी असं आवाहन त्यांनी केलं. त्यावर सुरक्षेच्या मुद्यावर कुठलीही तडजोड करणार नाही असं आश्‍वासन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिलं. पण अणुऊर्जाला विरोध करणं धोकादायक आहे असंही ते म्हणाले.

close