खासदार विजय दर्डा यांचे `स्ट्रेट थॉट`पुस्तक प्रकाशित

May 16, 2012 5:42 PM0 commentsViews: 2

16 मे

राज्यसभेचे खासदार आणि लोकमत मीडिया लिमिटेडचे अध्यक्ष विजय दर्डा यांच्या `स्ट्रेट थॉट` या पुस्तकाचं प्रकाशन आज नवी दिल्लीत झालं. विजय दर्डा यांनी विविध प्रश्नांवर लिहिलेल्या लेखांचा या पुस्तकात समावेश आहे. इंग्रजी, मराठी आणि हिंदीतही हे पुस्तक आहे. राज्यसभेचे विरोधी पक्षनेते अरूण जेटली, राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालुप्रसाद यादव, काँग्रेसचे खासदार मणिशंकर अय्यर, सीपीएमचे खासदार सीताराम येचुरी, पंतप्रधानांचे माजी प्रसिध्दी सल्लागार एच.के. दुवा आणि सीएनएन-आयबीएन चे एडिटर इन चीफ राजदीप सरदेसाई या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमानंतर `प्रसिध्दी माध्यमं आणि राजकारण्यांचे संबंध` या विषयावर परिसंवादही झाला.

close