नाशिकमध्ये 2 लाचखोर पोलीस कॉन्स्टेबल निलंबित

May 16, 2012 11:05 AM0 commentsViews: 48

16 मे

नाशिकमध्ये लाचखोर प्रकरणी अंबड पोलीस स्टेशनचे दोन कॉन्स्टेबल युवराज पाटील आणि डी के पवार या दोघांना निलंबित करण्यात आलं आहे. शाईन मेटल्स या कारखान्यावर पडलेल्या धाडीनंतर, पोलिसांनी जप्त केलेल्या फाईलवरुन या दोघांमध्ये वाद झाला होता. याप्रकरणी दोघांवर दोन लाखांची लाच घेण्याचा आरोप आहे. मात्र, या दोघांमध्ये 'तुझा वाटा, माझा वाटा' यावरून झालेल्या भांडण दोघांच्या अंगाशी आलं.

अंबडमध्ये भंगार बाजारात झालेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये चोरीचा माल म्हणून शाईन मेटल या कारखान्यातून 34 लाखांचा माल जप्त करण्यात आला. तो माल अधिकृत असल्याच्या पावत्या मालकाने दाखवल्या तर ती फाईलच पोलीस अधिकार्‍यांनी गायब केली. आणि हा माल परत घेण्यासाठी पोलिसांनी चक्क 2 लाखांची लाच मागितल्याची तक्रार आहे. विशेष म्हणजे गहाळ झालेली फाईल स्वत: घेऊन जाताना अंबडचे पोलीस अधिकारी या कारखान्याच्या कॅमेर्‍यात कैद झाले होते. अखेर या पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

लाचखोर पोलिसी खाक्या उघड

close