‘सचिनला खासदारकी का दिली ?’

May 16, 2012 12:45 PM0 commentsViews: 2

16 मे

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर राजकारणाच्या मैदानावर येणार हे ऐकून अनेकांना धक्का बसला अनेक चाहत्यांनी राजकारणात जाऊ नये अशी गळ घातली मात्र खासदारकी हा माझा सन्मान आहे मी खेळाडूचं राहणार आहे असं सांगून सचिनने यावादावर पडदा टाकला पण हा वाद काही थांबायला तयार नाही. आता हा वाद थेट कोर्टापर्यंत गेला आहे. सचिनला राज्यसभेची खासदारकी देण्यामागे काय कारण आहे ते सरकारने स्पष्ट करावे अशी नोटीस दिल्ली कोर्टाने सरकारला बजावली आहे. सचिनच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका दिल्ली हायकोर्टात दाखल करण्यात आली. या याचिकेवर कोर्टाने हे आदेश दिले आहे. दिल्लीचे माजी आमदार रामगोपाल सिंह सिसोदिया यांनी ही याचिका दाखल केली आहे. क्रिडापटूंची कशी नियुक्ती केली जाते याविषयी कोर्टाने सरकारचे मत मागवले आहे.

close