येडियुरप्पांच्या घरावर सीबीआयचे छापे

May 16, 2012 11:49 AM0 commentsViews: 3

16 मे

मायनिंग घोटाळ्याप्रकरणी मुख्यमंत्रीपद गमवावं लागलेल्या येडियुरप्पा यांना आता आणखी एक धक्का बसला आहे. आज सकाळी येडियुरप्पा यांच्या बंगलुरु, शिमोगातल्या घरांवर सीबीआयनं छापे टाकले आहेत. मुलगा आणि जावयाच्या घराचीही तपासणी करण्यात येतेय.बेल्लारी आणि बंगलोरसह एकूण आठ ठिकाणी छापे टाकण्यात आले. काल या प्रकरणी येडियुरप्पांविरोधात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आली आहे.

close