बियाणं टंचाईवरुन शेतकर्‍यांची पोलिसांवर दगडफेक

May 17, 2012 9:49 AM0 commentsViews: 2

17 मे

आधी दुष्काळ, पाणीटंचाई आणि आता बियाणांची टंचाई. मराठवाड्यातील शेतकर्‍यांपुढची संकटं काही संपत नाही. अखेर बीडमध्ये शेतकर्‍यांच्या संतापाचा उद्रेक झाला. जिल्ह्यातील धानोरा गावात कपाशीचं बियाणं मिळत नसल्यानं गेल्या तीन दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहे. आज सकाळी बियाणं बाजारात संतप्त शेतकर्‍यांनी बियाणांच्या दुकानावर हल्ला चढवला. दुकानांवर तुफाण दगडफेक केली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होताच शेतकर्‍यांनी पोलिसांवर दगडफेक सुरु केली. या दगडफेकीत 10 पोलीस जखमी झाले आहेत.परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्च केलाय. तसेच अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या आहेत. याप्रकरणी अजून कोणाला अटक केली नाही. मात्र, धानोरा गावात तणावाचे वातावरण आहे.

close