चंद्रपूरमध्ये वाघाची हत्या

May 18, 2012 9:28 AM0 commentsViews: 3

18 मे

चंद्रपूरमध्ये मूल मार्गावर वाघाची हत्या झाल्याचं निष्पन्न झालं आहे. तस्करीसाठी शिकार्‍यांनी वाघाची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे. वनाधिकार्‍यांसह पोलीस अधीक्षकही घटनास्थळी दाखल झाले आहेत. 25 दिवसांमधली ही दुसरी घटना आहे. राज्यातील 25 वाघांच्या तस्करीची सुपारी शिकार्‍यांनी घेतल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणा(IB)नं दिला होता. यासाठी राज्य सरकारने विशेष सुरक्षा पथकाची निर्मिती केली होती. यासंदर्भात खबरदारी घेत जंगलातल्या सगळ्या पाणवठ्यांवरची गस्त वाढवण्यात आली होती. तसेच वाघांसाठीचे सापळे लावण्यात आल्याची माहिती देणार्‍याला 5 हजार रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. पण तरीही वनाधिकार्‍यांची नजर चुकवून वाघांची हत्या करण्यात आली आहे.

close