श्रीश सोसायटीच्या चौकशीचे मुख्यमंत्र्यांनी दिले आदेश

May 18, 2012 9:36 AM0 commentsViews: 5

18 मे

ठाण्याच्या श्रीश हाऊसिंग सोसायटी प्रकरणी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी तातडीच्या चौकशीचे आदेश दिले आहे. या प्रकरणाची ठाणे आयुक्त ए. राजीव ही चौकशी करणार आहे. श्रीश सोसायटीतल्या पुनर्विकासाच्या बांधकामाला मुख्यमंत्र्यांनी स्थगितीचे आदेश दिले होते. यावरुन विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, वरद वास्तूचे बिल्डर राजीव सावंत आणि स्वत: मुख्यमंत्री या तिघांवर हातमिळवणी केल्याचा आरोप सोसायटी सदस्यांनी केला होता. याची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत नगरविकास खात्याचे स्‌चव टी सी बेंजमीन आणि ए. राजीव उपस्थित होते. कालच मुख्यमंत्र्यांनी श्रीशच्या बांधकामावर स्थगिती आणली आहे.

close