पेड न्यूज प्रकरणाची अंतिम सुनावणी 29 मे रोजी

May 17, 2012 2:13 PM0 commentsViews: 4

17 मे

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या पेड न्यूज प्रकरणाची अंतिम सुनावणी 29 मे रोजी निवडणूक आयोग घेणार आहे. यावेळी 25 मे पर्यंत सर्व बाजूंनी आपली भूमिका स्पष्ट करावी असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे. 10 जून रोजी मुख्य निवडणूक आयुक्त एस वाय क्युरेशी निवृत्त होत आहेत. त्याआधी हे प्रकरण निकालात निघण्याची शक्यता आता निर्माण झाली आहे. 2009 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकींदरम्यान अशोक चव्हाण यांनी अनेक वृत्तपत्रात जाहिराती दिल्या होत्या. पण त्यांचा खर्च मात्र निवडणूक आयोगाकडे दिला नव्हता असं याचिकाकर्ते किरीट सोमय्या यांचं म्हणणं आहे तर या जाहिराती नसून बातम्याच होत्या असा अशोक चव्हाण यांचा दावा आहे.

close