पंजाबचा ‘सुपर’ विजय, चेन्नईचं आव्हान धोक्यात

May 17, 2012 2:49 PM0 commentsViews: 2

17 मे

आयपीएलमध्ये महेंद्रसिंग धोणीच्या चेन्नई सुपरला पराभवाचा धक्का बसला आहे. ऍडम गिलख्रिस्टच्या किंग्ज इलेव्हन पंजाबने चेन्नईचा 7 विकेट राखून दणदणीत पराभव केला आहे. चेन्नईची लीगमधली ही शेवटची मॅच होती, आणि प्ले ऑफ गाठण्यासाठी चेन्नईला या मॅचमध्ये विजय महत्वाचा होता. पण पराभवामुळे चेन्नईचं प्ले ऑफमधलं आव्हान धोक्यात आलं आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या चेन्नईने विजयासाठी 121 रन्सचं माफक आव्हान ठेवलं होतं. पण ऍडम गिलख्रिस्टच्या हाफसेंच्युरीच्या जोरावर पंजाबनं हे आव्हान सहज पार केलं. या विजयामुळे पंजाबनं प्ले ऑफमधलं आपलं आव्हान मात्र कायम ठेवलं आहे.

close