अंध,अपंगांना मिळणार नाहीत नवे स्टॉल्स

May 17, 2012 3:10 PM0 commentsViews: 7

17 मे

वाढत्या ठाणे शहरात फूटपाथवर टपर्‍यांची संख्या वाढू नये यासाठी भविष्यात गट इ कामगारांना तसेच अंध आणि अपंगांना देण्यात येणारे स्टॉल्स दिले जाऊ नयेत असा निर्णय ठाणे महापालिकेच्या 19 मे रोजी होणार्‍या सर्वसाधारण सभेत घेतला जाणार आहे. त्यामुळे नव्याने देण्यात येणारे 1002 नव्या स्टॉल्सला परवानगी मिळू शकणार नाही. महापालिकेच्या अंतर्गत आत्तापर्यंत 157 अंध आणि 193 अपंगांना ह्या स्टॉल्सचं वाटप करण्यात आलंय. महापालिकेकडं येणार्‍या तक्रारीनुसार महापौरांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या समितीने यापुढे परवाने देऊ नयेत यासाठी प्रस्ताव येणार आहे. शहरात पाचपाखाडी, काजूवाडी आणि जोगीला मार्केट याठिकाणी अधिक स्टॉल्स आहेत. जर शहरात अशाप्रकारे घेण्यात आलेले काही अनधिक़ृत स्टॉल्स असतील, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत असं समितीने सुचवलं आहे.

close