जळगावात बिबट्याचा थरार, लहान मुलावर हल्ला

May 18, 2012 11:20 AM0 commentsViews: 12

18 मे

जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यात बिबट्याने धूमाकुळ घातला आहे. हिवरी गावाजवळ शेतात काम करीत असलेल्या एका लहान मुलावर बिबट्याने हल्ला केला. सोबत काम करत असलेल्या गावकर्‍यांनी प्रचंड गदारोळ केल्याने बिबट्या या मुलाला सोडून पळ काढला. जखमी अक्षयला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बिबट्याच्या अचानक केलेल्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या गावकर्‍यांनी बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाला कळवले. बिबट्या कुठे लपला आहे याचा शोध-शोध वन विभागाचे कर्मचारी आणि गावकरी घेत आहे. बिबट्याचा शोध घेत असताना एका शेतात लपल्याचं दिसून आलंय. आता या बिबट्याला पकडण्यासाठी कर्मचार्‍यांनी सापळा रचला असून मात्र बिबट्या काही फासात अडकत नसल्यामुळे परीसरात भीतीचं वातावरण आहे.

close