शिववडा जागतिक पातळीवर जाणार – उद्धव ठाकरे

November 24, 2008 6:08 PM0 commentsViews: 4

24 नोव्हेंबर, मुंबई विनोद तळेकर शिवसेनेचा शिववडा आज जागतिक बाजारपेठेत दाखल झाला. सत्तरच्या दशकात शिवसेनेने मुंबईत वडापावला उद्योगाचा दर्जा दिला होता आणि आता याच वडापावला शिवसेना ग्लोबल करणार आहेत.आज शिवाजी पार्कवर या शिववडापावचं ब्रँडिंग करण्यात आलं. त्यासाठी राज्यभरातून 27 वडापाव उद्योजकांची निवड करण्यात आली. त्यातली एक युनिक टेस्ट निवडण्याची जबाबदारी शिवसेनेनं शेफ निलेश लिमयेंना दिली होती. ' मराठी माणसाचा वडापाव जागतिक पातळीवर जाणार आहे. कोको कोला आणि मॅक्डॉनाल्ड हे वडापावच्या सोबतीला आहेत. हा वडापाव देशाच्या सीमा ओलांडून नक्कीच जगाच्या पाठीवर लोकप्रिय झाल्याशिवाय राहणार नाही ', असा विश्वास यावेळी उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला.

close