कापसाच्या बियाण्यावरुन शेतकर्‍यांचा उद्रेक

May 18, 2012 2:09 PM0 commentsViews: 6

18 मे

दुष्काळाने त्रस्त शेतकर्‍यांच्या त्रास काही पिच्छा सोडायला तयार नाही कापसाच्या बियाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. काल बुधवारी बीडमध्ये बियाण्यांच्या टंचाईवरून दगडफेक आणि लाठीचार्च झाल्याची घटना घडली तर आज येवल्यातही शेतकर्‍यांचा उद्रेक पाहायला मिळाला. ऐन खरिप हंगामाच्या तोंडावर व्यापार्‍यांकडून बियाण्यांची टंचाई निर्माण केली जातेय. त्यामुळे शेतकर्‍यांना अत्यंक महाग दरानं काळ्या बाजारातून बियाणं विकत घ्यावं लागतंय. त्यामुळे राज्यातील शेतकर्‍यांमध्ये प्रचंड रोष आहे. व्यापार्‍यांकडून शेतकर्‍यांची प्रचंड लूट होत असताना सरकार मात्र स्वस्थ बसलेलं आहे असा आरोप करत शेतकरी आक्रमक झाले आहे.

येवला बंदची हाक

दुसरीकडे कापसाच्या बियाण्याच्या तुटवड्याच्या निषेध व्यक्त करण्यासाठी येवल्यात शेतकर्‍यांनी रस्ता रोको केला. यावेळी संतप्त शेतकर्‍यांनी दगडफेकही केली. त्यामुळे पोलिसांनी जबर लाठीचार्ज केला. 25 हजार बियाण्यांच्या थैल्यांची मागणी असताना फक्त सात हजार पॉकेट उपलब्ध आहेत. त्यातही शेतकर्‍यांची मोठी अडवणूक व्यापार्‍यांकडून केली जात आहे. म्हणूनच शेतकर्‍यांचा हा उद्रेक पाहायाला मिळतोय. शेतकर्‍यांवर लाठीचाराच्या निषेधार्थ उद्या सर्वपक्षीय बंद पुकारण्यात आला आहे. दरम्यान, कापूस बियाणांची टंचाई काही जिल्ह्यांपुरती निर्माण झाली आहे. त्याची माहिती घेण्याचं काम सुरू झालं असून लवकरात लवकर याचं नियोजन करून टंचाई दूर करण्याचे आदेश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यंानी दिले आहेत.

close