मुंबईकरांना बेस्टच्या वीजदरवाढीचा शॉक

May 17, 2012 5:26 PM0 commentsViews: 2

17 मे

महागाई त्रस्त झालेल्या मुंबईकरांना बेस्टने दरवाढीचा शॉक दिला आहे. बेस्टची विज आता 27.6 टक्यानी महागणार आहे. या दरवाढीला राज्य वीज नियामक आयोगाने हिरवा कंदील दिला आहे. त्यामुळे ही दरवाढ 1 जून पासून लागू होणार आहे.

महागाईचा डोंगर सर करणार्‍या मुंबईकरांच्या खिश्यावर आता आणखी भर पडणार आहे. बेस्टच्या वीज दरात 27.6 टक्के वाढ करण्यात आली आहे. राज्य वीज आयोगाने या अगोदर 1 सप्टेंबर 2010 ला सुधारणा केली होती. बेस्टच्या आर्थिक वर्ष 2011-12 करिता महसूली गरज आणि वीज दरास मान्यतेसाठी याचिका दाखल केली होती. आयोगाने याबद्दल ग्राहक आणि हितसंबंधितांकडून सूचना मागून घेतल्या होत्या. याचा अभ्यास करुन 2011-12 च्या आदेशाने वीज दर निश्चित करण्यात आले आहे. सुधारित वीज दर 1 जून पासून लागू होणार आहे.

बेस्टने सध्याच्या वीज दरानुसार आर्थिक वर्षात आता पर्यंत 1061 कोटींचा महसूल तोटा होत असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे ही दरवाढ करण्यात आली असून यातून 51 टक्के महसूलात वाढ होणार असल्याचा अंदाज व्यक्त केलाय. आयोगाने वीज दरवाढ 27.6 टक्के मंजूर दिली आहे आणि वीज पुरवठ्याचा आयोगाने मान्यता दिलेला सरासरी खर्च 7.78 प्रति युनिट आहे. या सुधारीत वीज दरामुळे महसूलात 761 कोटीची वाढ होण्याची अपेक्षा केली आहे. आयोगाने आपल्या वेबसाईट www.mercindia.org.in वर बेस्टचा वार्षिक अहवाल उपलब्ध केला आहे.

close