पायलट्सचा संप बेकायदेशीरच : कोर्ट

May 17, 2012 5:46 PM0 commentsViews: 4

17 मे

दिल्ली हायकोर्टाने एअर इंडियाच्या पायलट्स गिल्डला जोरदार दणका दिला आहे. गिल्डच्या पायलट्सनं पुकारलेला संप बेकायदेशीर असल्याचं कोर्टानं पुन्हा एकदा म्हटलं आहे. यापूर्वीही कोर्टाने हा संप बेकायदेशीर असल्याचं म्हटलं होतं. त्याविरोधात इंडियन पायलट्स गिल्डने याचिका दाखल केली होती. ती याचिका कोर्टाने फेटाळली आहे. दरम्यान, हवाई वाहतूक मंत्र्यांनी आता संपकरी पायलट्सविरोधात आणखी आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच फ्लाईंग अलाऊंस आणि इन्सेटिव्हजमध्ये चुकीच्या पद्धतीनं वाढ करून 2 कोटींपेक्षाही जास्त पैसे पायलट्सनं खिशात घातल्याचा आरोप त्यांनी केला आहे. अशा प्रकारच्या एकूण 161 गैरप्रकारांची दक्षता विभाग चौकशी करत असल्याची माहिती त्यांनी दिली.

close