मुंबईकरांनो,मोनोरेलसाठी अजून थोडा धीर धरा !

May 18, 2012 3:18 PM0 commentsViews: 3

18 मे

मुंबईकरांची ट्राफिकमधून सुटका करण्यासाठी बहुचर्चित मोनोरेलसाठी मुंबईकरांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. पहिल्या टप्प्यात महालक्ष्मी ते वडाळा अशी मोनोरेल धावणार होती. त्याबद्दल जुलै महिन्यात काम पूर्ण करण्याचे आश्वासन एमएमआरडीए (MMRDA)नं दिलं होतं. मात्र आता नोव्हेंबर ही नवी डेडलाईन एमएमआरडीएनं दिली आहे. जमिनीखाली पाईपलाईन्सचं प्रचंड जाळं असल्यानं खड्डे खोदायला उशीर लागतोय. त्यामुळेच डेडलाईन चार महिने पुढे गेल्याचं स्पष्टीकरण अधिकार्‍यांनी दिलं आहे. एमएमआरडीएनं मोनोरेलचं भाडंही पहिल्यांदाच जाहीर केलं आहे. किमान भाडं 8 रूपये, तर कमाल भाडं 20 रूपये असल्याचं एमएमआरडीएनं जाहीर केलं आहे.

close