मेरी कॉमनं पटकावलं ऑलिम्पिकचं तिकीट

May 18, 2012 3:29 PM0 commentsViews: 6

18 मे

भारताची अव्वल महिला बॉक्सर मेरी कॉमनं लंडन ऑलिम्पिकचं तिकीट पटकावलं आहे. चीनमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशीपमध्ये खरं तर क्वार्टरफायनलमध्ये मेरी कॉमचा पराभव झाला होता. पण तिला नमवणार्‍या वर्ल्ड नंबर 2 निकोला ऍडम्सने सेमी फायनलची मॅच जिंकत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे मेरी कॉमचं लंडन ऑलिम्पिकचं तिकीट पक्क झालं आहे. मेरी कॉम 51 किलो वजनी गटात लढणार आहे. ऑलिम्पिक खेळणारी ती पहिली भारतीय महिला बॉक्सर ठरली आहे. येत्या 27 जुलैपासून लंडन ऑलिम्पिक सुरू होत आहे. बॉक्सिंगमध्ये जगजेतेपद पटकावणारी मेरी कोम पहिली भारतीय महिला ठरली होती. तीच्याकडून या ऑलिम्पिकमध्ये मेडलच्या अपेक्षा आता आणखी वाढल्या आहेत.

close