मुंबईतील पाण्याचा रेट एक रुपयानं कमी होणार

November 24, 2008 6:27 PM0 commentsViews: 3

24 नोव्हेंबर मुंबईशिल्पा गाडमुंबईतील वीस लाख रहिवाशांना बीएमसी नवीन वर्षाची भेट देणार आहे. पाण्याचा रेट एक रुपयानं कमी करून. मात्र म्हाडा आणि एसआरएच्या घरांमध्ये राहणा-यांनाच याचा फायदा होईल. विक्रोळीच्या कन्नमवार नगर ह्या म्हाडाच्या कॉलनीत दिवसातून फक्त तीन तास पाणी येतं. पण इथले रहिवासी सद्या खुशीत आहेत. कारण त्यांच्या पाण्याच्या दरात बीएमसीनं केलेली कपात. दर हजार लीटरमागे बीएमसीनं पाण्याचे दर सव्वा रुपयानं कमी केले आहेत. यापूर्वी हा दर साडे तीन रुपये होता. जो आता सव्वा दोन रुपये होणार आहे. बीएमसीच्या प्रस्तावानुसार नवीन दर 1 जानेवारीपासून लागू होणार आहे. साडेतीनशे स्क्वेअर फूटपेक्षा कमी घर असणा-यांना आणि एस आरए किंवा म्हाडाच्या घरात रहाणा-यांनाच ही सवलत मिळेल.

close