शाहरुखला वानखेडेवर 5 वर्षांची बंदी

May 18, 2012 9:10 AM0 commentsViews: 1

18 मेवानखेडे स्टेडियमवर घातलेला गोंधळ शाहरुख खानला महागात पडला आहे. वानखेडे स्टेडियमवर यायला शाहरुखला पाच वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. एमसीएच्या आजच्या बैठकीत हा महत्वपूर्ण निर्णय झाला. एमसीएचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन ही माहिती दिली.पण याच मुद्द्यावरून एमसीए आणि बीसीसीआय आमनेसामने आलेत. अशी बंदी घालण्याचा अधिकार फक्त बीसीसीआयला आहे, एमसीएला नाही असं आयपीएलचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी म्हटलं आहे. एमसीएची बंदी म्हणजे फक्त शिफारस असल्याचं त्यांनी म्हटलंय. दरम्यान, पोलिसांनी शाहरुखविरोधात तक्रार दाखल केलीय. त्याचा जबाब नोंदवला जाण्याची शक्यता आहे.

close