कन्नडीगांचा एसटी बस जाळण्याचा प्रयत्न

May 19, 2012 2:24 PM0 commentsViews: 2

19 मे

महाराष्ट्र एकिकरण समितीच्या सीमा मेळाव्याला परवानगी दिल्याने संतप्त झालेल्या कन्नड रक्षक वेदीकच्या कार्यकर्त्यांनी निपाणीमध्ये टवंगिरी घाटात महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस जाळण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यकर्त्यांनी बस घाटात अडवून जोरदार घोषणबाजी करत प्रवाशांना खाली उतरवले आणि बसवर दगडफेक करत बसखाली टायर जाळून टाकले. या घटनेमुळे भयभीत झालेल्या प्रवाशांनी घटनास्थळावरुन पळ काढला. या प्रकारामुळे बेळगावकडून कर्नाटकात जाणार्‍या सर्व बसेस यानंतर थांबवण्यात आल्या आहेत.

close