गर्भपात करताना महिलेचा मृत्यू ;डॉक्टराला अटक

May 19, 2012 9:18 AM0 commentsViews: 5

19 मे

बीड जिल्ह्यातल्या परळीत शुक्रवारी रात्री गर्भपात करत असताना मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी डॉ. सुदाम मुंडे यांना अटक केली आहे. त्यांच्यावर कलम 304 अ अंतर्गत परळी पोलीस स्टेशमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही महिला वडवणी तालुक्यातली होती. या महिलेला 4 मुली असल्याचं तिच्या नातेवाईकांनी सांगितलंय. विजयमाला उजगरे ही महिला पोटामध्ये दुखत असल्याच्या तक्रारीवरून परळी इथं डॉ. सुदाम मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी गेल्या. डॉक्टरांनी सिझेरियन करून गर्भपात केला. हा गर्भपात करताना मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू झाला.

हॉस्पिटलकडून यांसबंधी काहीही माहिती मिळाली नाहीय. दरम्यान, पोस्टमॉर्टेम रिपोर्टमध्ये महिलेचा गर्भपात झाल्याचं स्पष्ट झालंय. डॉ. मुंडेंविरूध्द 302 चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे. डॉ. सुदाम मुंडे यांच्या हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्भपात होत असल्याच्या तक्रारी आहेत. या हॉस्पिटलविरोधात यापूर्वी स्त्री भ्रूण हत्येसंदर्भात 3 गुन्हे दाखल आहेत. तरीही प्रशासन आणि पोलीस या हॉस्पिटलविरोधात कुठलीही कारवाई करत नाहीत, असा आरोप सामाजिक संघटना आणि परिसरातल्या लोकांकडून होतेय.

close