पुण्याचा शेवट कडूच;कोलकाता दुसर्‍या स्थानावर

May 19, 2012 6:01 PM0 commentsViews: 1

19 मे

आयपीएलच्या पाचव्या हंगामात सौरव गांगुलीच्या पुणे वॉरियर्सचा शेवटही पराभवानं झाला आहे. कोलकाता नाईट रायडर्सनं पुण्याचा 34 रन्सनं पराभव केला आणि या विजयाबरोबरच कोलकातानं प्ले ऑफमध्ये दुसरं स्थानही पटकावलं आहे. पहिली बॅटिंग करणार्‍या कोलकाता नाईट रायडर्सनं पुणे टीमसमोर 137 रन्सचं माफक आव्हान ठेवलं होतं. ब्रॅडन मॅक्युलम आणि शाकिब अल हसननं फटकेबाजी करत टीमला समाधानकारक स्कोर उभा करुन दिला. पण हे माफक आव्हानही पुणे टीमला पेलवलं नाही. पुण्याच्या टीमला वीस ओव्हरमध्ये 8 विकेट गमावत 102 रन्सच करता आले.

close