गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी बस पळवली

May 19, 2012 9:52 AM0 commentsViews: 1

19 मे

गडचिरोली जिल्ह्यातल्या कोटी हलेवरा जंगलातून काल रात्री 100 नक्षलवाद्यांनी एक एसटी बस पळवून नेण्याची घटना घडली आहे. अहेरी आगाराची ही बस आहे. ही बस अहेरीहून कोटीला जात होती. नक्षलवाद्यांनी रस्त्यात बस अडवून बंदूकीच्या धाकावर प्रवासी आणि ड्रायव्हर-कंडक्टरला खाली उतरवून बस पळवून नेली. याप्रकरणी नारगुंडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस आणि नक्षलविरोधी पथकाचं कोंबिंग ऑपरेशन सुरू आहे.

close