‘शाहरुखचा पारा अमेरिकेत का चढत नाही ?’

May 19, 2012 5:37 PM0 commentsViews: 6

19 मे

बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची अमेरिकेतील एअरपोर्टवर एकदा नाहीतर दुसर्‍यांना चौकशी होते. चार-पाच तास त्याला अडवून ठेवतात. त्याचे कपडे उतरवून झडती घेतात तेव्हा या शाहरुखचा पार चढत नाही. अमेरिकेत पुन्हा जाऊन अपमान करुन घेतो पण वानखेडेवर एका गरीब सुरक्षारक्षकांने अडवले म्हणून त्याला शिवीगाळ मारहाण करतो असा ठाकरी टोला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून लगावला. बुधवारी रात्री कोलकाताची मॅच संपल्यानंतर शाहरूखने वानखेडे स्डेडियमवर पुन्हा 'माय नेम इज खान' दाखविण्याचा प्रयत्न केला. मात्र येथेही शाहरूखचा शो फ्लॉप ठरला. दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याचा आरोप शाहरूखवर आहे. आणि नेहमीप्रमाणं त्यानं हे आरोप फेटाळून लावलेत. आपण 'सिलिब्रिटी' असल्यामुळेच हे आरोप होत असल्याचं त्यानं पूर्ण शुध्दीत जाहीर केलंय. भडकलेल्या शाहरूखनं सुरक्षारक्षकांना मारहाण, शिवीगाळ, धमक्या वगैरेंचा वापर केलाय. 'जिंदा गाड दूंगा' असा फिल्मी डायलॉग त्याने मारला. कायद्याच्या भाषेत ही धमकी आहे याबद्दल पोलिसांना काही वेगळे सांगायची गरज नाही.अमेरिकेच्या एअरपोर्टवर सुरक्षा रक्षक शाहरूख खानला चार पाच तास अडकून ठेवतात. त्याचे कपडे उतरवून झडती घेतात. तेव्हा या शाहरूखचा पारा चढत नाही. हा शाहरूख पुन्हा पुन्हा अमेरिकेत जाऊन आपला अपमान करून घेतो. पण वानखेडेवरच्या गरीब सुरक्षा रक्षकांशी हुज्जत घालतो असं टोला बाळासाहेबांनी लगावला.

शाहरुखच्या या वर्तनामुळे मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष विलासराव देशमुख यांनी तातडीने बैठक घेऊन शाहरुखला 5 वर्षाची वानखेडे बंदी घातली आहे. त्याच्यावर ही कारवाई एमसीएने आपल्यापरीने केली आहे पण त्यांच्यावर आजन्म बंदी घालण्याची भाषा करणारे आता कुठे आहे. स्वत:ला सिलिब्रिटी म्हणवून घेणार्‍यांवर पोलीस काय कारवाई करणार असा सवालही शिवसेनाप्रमुखांनी केला.

आपल्या देशात सामान्य माणसासाठी एक आणि सिलिब्रिटींसाठी दुसरा कायदा असतो. शाहरुखशी व्यक्तिगत शत्रुत्व किंवा त्यांच्याविषयी कोणताच राग नाही. आमचा झगडा प्रवृत्ती आणि विकृतीविरोधात आहे. अमिताभ बच्चन व त्यांचे कुटुंबीय,अनिल कपूर,आमीर खान,ह्रतिक रोशन ही मंडळी सेलिब्रिटी वर्तूळात मोडतात पण त्यांची समाजाशी नाळ जोडलेली आहे. अलीकडे अमिताभने विदर्भातील 114 गरीब शेतकर्‍यांचे कर्ज फेडले. म्हणजेच त्यांनी 114 कुटुंबांना मोठा हातभार लावला आहे. पण इकडे आयपीएलमध्ये पैशाच्या जोरावर मोठा डाव रंगला आहे. यातून शाहरुखने काही तरी शिकावे असा सल्लाही बाळासाहेबांनी अग्रलेखातून दिला.

close