93 वं अखिल भारतीय नाट्य संमेलन बारामतीत

May 21, 2012 6:52 AM0 commentsViews: 23

21 मे

आगामी 93 वं अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलन यावर्षी बारामतीत होणार आहे. नुकत्याच अखिल भारतीय नाट्यपरिषदेच्या नियामक मंडळाची बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत बारामती मध्ये 93 वं नाट्यसंमेलन होईल यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं . हे नाट्यसंमेलन बारामतीत या वर्षी डिसेबरमध्ये होणार आहे. केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या अमृतमहोत्सवाचं निमित्त साधून बारामतीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे . अशी माहिती नाट्यपरिषदेचे उपाध्यक्ष विनय आपटे यांनी दिली. मागिल वर्षी 92 वं नाट्यसंमेलन सांगलीत पार पडलं होतं.

close