सिद्धार्थ माल्याविरोधात महिलेनं बजावली नोटीस

May 19, 2012 7:55 AM0 commentsViews: 2

19 मे

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या खेळाडू ल्यूक पॉमर्शबॅकनं अमेरिकन महिलेची छेडछाड प्रकरणी सदरील महिलेनं टीमचा मालक सिद्धार्थ माल्याविरुद्ध कायदेशीर नोटीस बजावली आहे. माल्याने आपली माफी मागावी अशी मागणीही तिनं केली आहे. दिल्लीतल्या महिला आयोगाकडेही ती तक्रार करणार आहे. शुक्रवारी टिवट्‌रवर सिद्धार्थ माल्यानं या महिलेच्या चारित्र्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं. दरम्यान, दिल्ली पोलीस पीडित महिलेच्या भावी पतीचा जबाब नोंदवत आहेत. महिलेची छेडछाड करण्याचा आरोप असलेल्या ल्यूक पॉमर्शबॅकला पटियाला कोर्टाने जामीन दिला आहे.

close