गुलाबराव देवकरांना न्यायालयीन कोठडी

May 21, 2012 7:01 AM0 commentsViews: 2

21 मे

जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी अटकेत असलेल्या राज्यमंत्री गुलाबराव देवकर यांना कोर्टाने 30 मे पर्यंत न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. देवकरांसह एकूण 20 संशयित आरोपींना कोर्टाने न्यायालयीन कोठडीत पाठवलं आहे. दरम्यान, या सर्वांनी जामिनासाठी अर्ज केला आहेत. त्यावर सुनावणी सुरु आहे. आज सकाळी गुलाबराव देवकर यांना अटक करण्यात आली होती. जळगांवच्या बहुचर्चित घरकुल घोटाळ्यातील संशयित आरोपींचं अटकसत्र पोलिसांनी सुरु केलंय. या प्रकरणात 48 आजी-माजी नगरसेवकांना पोलिसांनी नोटीसही जारी केल्या होत्या. यातील 25 संशयित शनिवारी पोलिसांना शरण आले होते. 4 महिला नगरसेवकांसह 15 जणांना जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन दिलाय तर 10 बाहुबली नगरसेवकांची मात्र 30 मे पर्यंत कारागृहात रवानगी केली.

जिल्ह्याचे पालकमंत्री असलेल्या गुलाबराव देवकर यांच्याविरोधात 29 कोटीच्या घरकुल घोटाळयाची तक्रार 2006 ला तत्कालीन महापालिका आयुक्त डॉ.प्रवीण गेडाम यांनी 92 संशयितांविरुध्द दाखल केली होती. 4 महिन्यापूर्वी अप्पर पोलीस अधिक्षक ईशु सिंधु यांनी तपास सुरु केल्यानंतर आत्तापर्यंत 30 संशयितांना पोलिसांनी याप्रकरणी अटक केली होती. आमदार सुरेशदादा जैन यासह 17 जणांची जामीनावर सुटका झाली असून 13 संशयित कारागृहात आहे. हा घोटाळा झाला त्या कालावधीत गुलाबराव देवकर हे जळगाव नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष होते.

close