घरकुल घोटाळा प्रकरणी नगरसेवकांना न्यायालयीन कोठडी

May 19, 2012 11:06 AM0 commentsViews: 24

19 मे

जळगावच्या घरकुल घोटाळ्या प्रकरणी 25 आजी माजी नगरसेवकांना 30 मे पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यात 3 माजी नगराध्यक्षांचा समावेश आहे. त्यातील 11 जणांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. 25 आजी माजी नगरसेवकांना आज अटक करण्यात आली होती. जळगावातल्या 29 कोटींच्या घरकुल घोटाळ्यात 98 आरोपी आहेत. यात पालकमंत्री गुलाबराव देवकर यांचाही समावेश आहे. या घोटाळा प्रकरणात गुलाबराव देवकर यांनाही पोलिसांनी स्टेशनमध्ये बोलावलं आहे. पण अजूनही देवकर यांनी स्टेशनला हजेरी लावले नाही. घरकुल घोटाळा प्रकरणी आज पोलिसांनी 48 आजी, माजी नगरसेवकांना नोटीस बजावली होती. यात पालकमंत्री गुलाबराव देवकार यांचाही समावेश आहे. देवकर हे त्यावेळी जळगावचे नगराध्यक्ष होते. दरम्यान या नगरसेवकांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला आहे.

close