छेडछाड प्रकरणी ल्यूकला जामीन

May 19, 2012 11:45 AM0 commentsViews: 1

19 मे

छेडछाड प्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा खेळाडू ल्यूक पॉमर्शबॅकला जामीन मिळाला आहे. 30 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर त्याची सुटका करण्यात आली आहे. पण त्याला देश सोडून जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्याला त्याचा पासपोर्ट कोर्टाकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

दिल्ली येथील पटियाला हाऊस कोर्टाने शुक्रवारी ल्यूकच्या अटकेनंतर एका दिवसाचा अंतरिम जामीन दिला होता आज कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यावेळी कोर्टात हॉटेल मौर्याच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍याचे फूटेज सादर करण्यात आले. या फूटेजमध्ये सदरील अमेरिकन महिलेच्या रुममध्ये चार लोकांनी प्रवेश केला होता. यामध्ये ती महिला,तिचा प्रियकर,प्रियकराचा मित्र आणि ल्यूक सहभागी होता. काही वेळानंतर ती महिला बाहेर आली. ती महिला लिफ्टकडे गेली आणि ल्यूक आपल्या रुमकडे गेला. काही वेळानी ल्यूक परत त्या महिलेच्या रुमकडे आला आणि दरवाजा खोलण्याचा प्रयत्न करु लागला. यावेळी ल्यूकच्या हाताला पट्टी बांधलेली होती आणि दुसर्‍या हातात बाटली होती. ल्यूकच्या वकिलांनी युक्तीवाद करत ल्यूक हा त्या महिलेच्या रुममध्ये जबरदस्तीने घुसला नसून तो चौघांसोबत रुममध्ये गेला होता. हे फूटेज पाहून ल्यूकला जामीन देण्यात आला. पण त्याला सध्या देश सोडता येणार नाही आणि पीडित महिलेशी संपर्क साधता येणार नाही असा आदेश कोर्टाने दिला.

close