वीजेचा शॉक लागून बिबट्या, रानडुक्करचा मृत्यू

May 21, 2012 9:13 AM0 commentsViews: 5

21 मे

राज्य महावितरणच्या गलथान कारभारामुळे पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळ मादी बिबट्या आणि तिच्या तीन पिल्यांचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना घडली आहे. पेंच व्याघ्र प्रकल्पाजवळील मानसिंग देव अभायरण्याजवळ वनविकास महामंडळाच्या सालेघाट क्षेत्रातीला 655 विभागात ही घटना घडली. या ठिकाणी एका वीजेच्या खांबाजवळ एक पूर्ण वाढ झालेली मादा बिबट्या आणि तीचे दोन पिलं तसेच त्यांच्यासोबत एक रान डुक्कर आणि एक मुंगुस मृत अवस्थेत आढळले. दोन आठवड्यांपूर्वी आलेल्या अवकाळी पाऊस आणि वादळामुळे विजेची तार तुटून खांबावर पडल्यामुळे जमिनीत वीज प्रवाह उतरला त्यामुळेचे या प्राण्यांचा मृत्यू झाला असल्याच उघड झालं आहे. मात्र, प्रकल्पाजवळ प्रत्येक वेळी वादळ,पावसामुळे वीजेच्या तारा तुटण्याचे प्रकार घडत असतात मात्र महावितरणच्या कर्मचार्‍यांनी वेळीच लक्ष न दिल्यामुळे तीन मुक्या प्राण्यांना आपला जीव गमवावा लागला.

close