‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ प्रेक्षकांच्या भेटीला

May 21, 2012 10:36 AM0 commentsViews: 45

21 मे

प्रसिद्ध सिने अभिनेता नंदु माधव यांनी प्रथमच दिग्दर्शित केलेलं आणि राजकुमार तांगडे लिखीत एक आगळं वेगळं नाटक 'शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला' काल प्रेक्षकांच्या भेटीला आलं. शिवाजी महाराजांचं 350 वर्षापुर्वीचं एक ऐतिहासिक पर्व त्याचबरोबर राज्यकारभारातली धोरणं मांडण्याचा प्रयत्न त्यांनी या नाटकातून केला आहे. शिवाजी महाराजांचा राज्यकारभार सर्वधर्मसमभावावर कसा चालला होता याचं एक मार्मिक चित्रण करण्यात आलंय. या कथेला जोड आहे ती संभाजी भगत यांच्या शाहिरीची…साचेबध्द मांडणी बरोबरच शाहिरीनं नाटकात एक वेगळीच रंगत आणली आहे.नाटक पहाताना प्रेक्षकांच्या अंगावर शहारा येतो इतकं नक्की ..नंदु जाधव यांनी रंगभूमीवर केलेल्या या वेगळ्या प्रयत्नाला रसिक प्रेक्षकांनीही तितकीच उत्तम दाद दिली आहे.

close