आयसीएसईत ठाण्याची शलाका कुलकर्णी देशात पहिली

May 19, 2012 3:46 PM0 commentsViews: 4

19 मे

आयसीएसई (ICSE) बोर्डाच्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. आणि या निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. या परीक्षेत ठाण्याच्या सिंघानिया हायस्कूलची शलाका कुलकर्णी ही देशात पहिली आली आहे. तिला 98.80 टक्के गुण मिळाले आहेत. पहिला क्रमांक दोघांमध्ये विभागून देण्यात आला आहे. त्यात ठाण्याची शलाका कुलकर्णी आणि धनाबादच्या कॅरमेल हायस्कूलची माधवी सिंग हिनंही हे यश संपादन केलं आहे.

close