अखेर काळ्या पैशाबाबत सरकारने मांडली श्वेतपत्रिका

May 21, 2012 1:05 PM0 commentsViews: 1

21 मे

अखेर विरोधकांच्या मागणीवर सरकारने काळ्या पैशाबाबत लोकसभेत आज श्वेतपत्रिका मांडली. अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी ही श्वेतपत्रिका मांडली. कोणतीही मालमत्ता खरेदी करण्यापूर्वी आता आयकर विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र बंधनकारक करण्याचा प्रस्ताव सरकारने ठेवला आहे. तसेच मालमत्ता विक्रीसाठी टीडीएस (TDS) प्रमाणपत्रही आता बंधनकारक असेल. तसेच मालमत्तेबाबत पाच टक्के नोंदणी करही भरावा लागेल असं सुचवण्यात आलं आहे. तसेच 5 लाखांच्यावरील सोनं खरेदीसाठी पॅनकार्ड अनिवार्य करण्याचाही प्रस्ताव आहे. त्याचबरोबर स्वीस बँकेत असलेल्या काळ्या पैशाचं प्रमाणही कमी झाल्याची माहिती या श्वेतपत्रिकेत देण्यात आली आहे.

close