औरंगाबादमध्ये इंजिनियरींगचा पेपर फुटला

May 23, 2012 12:41 PM0 commentsViews: 6

23 मे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या इंजिनिअरिंगच्या थर्ड सेमिस्टरचा पेपर फुटल्याने एकच खळबळ उडाली आहे. पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर कुलगुरु डॉ. विजय पांढरीपांडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. अशोक चव्हाण यांनी तातडीची बैठक बोलावून आजचा पेपर रद्द करण्याचा निर्णय घेतला. याबाबत तीन सदस्यीय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा पेपर आता विद्यापीठ पुढे ढकलला आहे. विद्यापीठाअंतर्गत येणार्‍या 4 जिल्ह्यातील 16 सेंटरवर 7 हजार 426 विद्यार्थी आज परीक्षा देणार होते. मात्र सकाळीच काही विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका फुटल्याचं लक्षात आल्यानंतर तक्रार केली. आता नेमका कोणी पेपर फोडला आणि पेपर सेंटरचा यात सहभाग आहे, याचीही तपासणी करुन संबधीतावर कारवाई करणार असल्याचं परीक्षा नियंत्रक डॉ अशोक चव्हाण यांनी सांगितलं आहे.

close