मुंबईतला अनोखा स्वेटर बाजार

November 25, 2008 5:14 AM0 commentsViews: 7

25 नोव्हेंबर, मुंबईशची मराठेथंडी सुरू झाली की मुंबईकरांची पावलं वळतात ती स्वेटर खरेदीकडं. असाच बाजार मुंबईत अनेक ठिकाणी भरतो आणि तो देखील चार महिन्यांसाठी. सकाळचे 9 वाजले की प्रेमा आणि तिचे बाकी साथीदार दुकान लावायला घेतात. आणि सगळ्यांना वेध लागतात बोहनीचे. मुंबईत नाना चौक,चेंबुर, व्हीटी. अशा अनेक ठिकाणी हे स्वेटरवाले आपल्याला दिसतील. पासंगची तर मुंबईत येउन स्वेटर विकणारी ही दुसरी पिढी. "मी पहिल्यांदा आईबरोबर इथे आले. आता मी दर वर्षी इथे येते. माझ्याकडे सगळ्या प्रकारचे वुलनचे सगळ्या प्रकारचे कपडे मिळतात. त्यांना या काळात बरीच मागणी असते" असं पासननं सांगितलं.हिमाचल प्रदेश,ओरिसा या ठिकाणांहून ही लोकं मुंबईत स्वेटर विकायला येतात, मात्र महागाईचा परिणाम त्यांच्या धंद्यावरही झालाय. आपलं प्रॉफिट मार्जिन 5-10 रुपयांवर आल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.असं असलं तरी मुंबई त्यांच्यासाठी खास आहे. मुंबईतला जुहू बीच आणि तिथली भेळपूरी, आईस्क्रीमवर हे लोक फिदा आहेत. मुंबईतली माणसंही खूप चांगली असून त्यांच्यापासून भीती वाटत नसल्याचंही या लोकांनी सांगितलं.

close