लोडशेडिंगला वैतागलेल्या नागरीकांनी अधिकार्यांना कोंडले

May 23, 2012 4:31 PM0 commentsViews: 4

23 मे

ठाणे जिल्ह्यातल्या विक्रमगडमध्ये लोडशेडिंगला वैतागलेल्या नागरीकांनी आज आंदोलन केलं. महावितरणच्या अधिकार्‍यांना त्यांनी पंचायत समितीच्या रेस्ट हाऊसमध्ये तीन तासापासून डांबून ठेवलं होतं. व्यापार्‍यांनीही सर्व बाजारपेठ बंद ठेवल्या होत्या. विक्रमगडमध्ये जवळपास 12 तास भारनियमन होतं. संध्याकाळचं भारनियमन कमी करा अशी नागरिकांची मागणी होती. यासंदर्भात तहसिलदार, महावितरणच्या अधिकार्‍यांमध्ये चार बैठकी पार पडल्या. मात्र महावितरणने मागण्यांचा विचार केला नाही. त्यामुळे अखेर नागरीकांना रस्त्यावर उतरले.

close