आंध्रप्रदेशात रेल्वे अपघातात २4 ठार

May 22, 2012 9:52 AM0 commentsViews: 6

22 मे

आंध्रप्रदेशमधील अनंतपूर जिल्ह्यात पहाटे 3 च्या सुमारास दोन रेल्वेची टक्कर झाली आहे. या अपघातात 24 लोकांचा मृत्यू तर 70 पेक्षा अधिक जण जखमी झाले आहे. जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हुबळीहून बंगलोरकडे येणाऱ्या हंपी एक्स्प्रेसला अनंतपूरच्या पेनकोंडा स्टेशनजवळ अपघात झाला. अनंतपूरच्या स्टेशनवर उभ्या असलेल्या मालगाडीला पाठीमागून हंपी एक्स्प्रेसने धडक दिली. या धडकेमुऴे एक्स्प्रेसच्या इंजिनच्या मागिल तीन डब्यांचे सर्वाधिक नुकसान झाले. यात एका डब्याला आग लागली होती मात्र लवकरच आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं,

घटनस्थळी बचावकार्य सुरु आहे. पण तीन डब्यात काही प्रवासी अडकण्याची भीती आहे. हा अपघात ड्रायव्हरच्या चुकीमुळे झाला असल्याचा प्राथमिक अंदाज रेल्वे खात्याने व्यक्त केला आहे. घटनास्थळी रेल्वेमंत्री मुकूल रॅाय रवाना झाले आहे. तसेच या अपघाताच्या चैाकशीचे आदेश रेल्वे मंत्र्यांनी दिले आहे. या अपघातात मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना 5 लाख आणि गंभीर जखमी झालेल्यांना 50 हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

close