बीसीसीआयच्या यादीतून माजी खेळाडू ‘आऊट’

May 23, 2012 5:06 PM0 commentsViews: 4

23 मे

बीसीसीआयच्या वन टाईम बेनिफिट योजनेअंतर्गत काल भारताच्या माजी खेळाडूंना चेकचं वाटप करण्यात आलं. पण या यादीतून भारताचे माजी कॅप्टन कपिल देव, किर्ती आझाद आणि मोहम्मद अझरुद्दीन यांना वगळण्यात आल्यानं नवा वाद निर्माण झाला आहे. कपिल देव आयसीएलशी संबंधीत होते, अझरुद्दीनवर मॅचफिक्सिंग प्रकरणात बंदी घालण्यात आली होती. तर आयपीएलमधल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी किर्ती आझाद यांनी नुकतंच एकदिवसाचं उपोषण केलं होतं. या कारणांमुळे या तिनही खेळाडूंना बोनसची रक्कम देण्यात आलेली नाही. या यादीतून वगळण्यात आलं असलं तरी आयपीएल आणि बीसीसीआयविरुध्द आवाज उठवणार असल्याचं किर्ती आझाद यांनी म्हटलं आहे.

close