बारावीचा निकाल 25 मे रोजी

May 23, 2012 9:10 AM0 commentsViews: 1

23 मे

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाला येत्या 25 मे म्हणजेच दोन दिवसांनी शुक्रवारी ऑनलाईन जाहीर होणार आहे. दुपारी एक वाजता हा निकाल शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना या निकालाची ऑनलाईन प्रिंट काढता येईल. हीच प्रिंट प्रवेशासाठी अधिकृत मानली जाणार असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी मूळ गुणपत्रिकेची वाट पाहावी लागणार नाही. यंदाच्या वर्षी फेब्रुवारी -मार्चमध्ये झालेल्या बारावीच्या परीक्षेला राज्यभरातून 13 लाख विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. येत्या शुक्रवारी जाहीर होणार्‍या या निकालाकडे राज्यभरातील लाखो विद्यार्थाची उत्सुकता लागलेली आहे.

बारावीचा निकालासाठी वेबसाईट : http://mahresult.nic.in/

close