काँग्रेसमध्ये तंटामुक्ती मोहीम राबवा – पतंगराव कदम

November 25, 2008 5:17 AM0 commentsViews: 7

25 नोव्हेंबर, मुंबई"काँग्रेसचा पराभव फक्त काँग्रेसच करू शकतो. इतर पक्षांमध्ये तेवढी ताकद नाही" काँग्रसचं अंतर्गत राजकारण चव्हाट्यावर आणणारं हे विधान केलंय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि सहकारमंत्री पतंगराव कदम यांनी. ते ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत होते. गावागावात जशी तंटामुक्त मोहीम चालवली जाते तशी काँग्रेसमधेही चालवली पाहिजे. ज्या दिवशी काँग्रेस तंटामुक्त होइल त्या दिवशी काँग्रेस यशस्वी होइल, असं विधानही पंतगराव कंदम यांनी यावेळी केलं.

close